जळगाव (प्रतिनिधी) :- गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंगतर्फे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विद्यार्थी कल्याण विभागाच्या वतीने विशेष मार्गदर्शन सत्राचे आयोजन करण्यात आले.
या सत्रात जळगाव शहर पोलीस स्टेशनचे पोलीस अंमलदार रवींद्र प्रल्हाद तायडे (दया ) यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना विविध महत्त्वपूर्ण विषयांवर मार्गदर्शन केले.या कार्यक्रमात त्यांनी सायबर क्राईम व त्यावरील उपाययोजना, व्यसनमुक्तीचे महत्त्व, जीवनात खेळाचे स्थान, करिअर मार्गदर्शन आणि इतर अनेक विषयांवर माहितीपूर्ण व प्रबोधनात्मक भाषण केले. त्यांनी सांगितले की, आजच्या युवा पिढीला जर संभाव्य धोके व परिणाम आधीच सांगितले, तर त्यांच्या कडून भविष्यात होणारे अपराध थांबवता येऊ शकतात.या कार्यक्रमाचे आयोजन प्राचार्या प्रा. विशाखा गणवीर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले.विद्यार्थी कल्याण विभाग प्रमुख प्रा.मनोऱमा,प्रा. स्वाती गाडेगोणे,प्रा.शिल्पा वाघमारे आणि प्रा पायल हांडे यांनी या कार्यक्रमाचे नियोजन व संयोजन केले.या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक जबाबदारीची जाणीव, स्वयंशिस्तीचे महत्त्व आणि सुरक्षित डिजिटल जीवनाबद्दलची जागरूकता निर्माण झाली. कार्यक्रमास विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.