जळगाव तालुक्यातील शिरसोली येथे आनंदोत्सव
शिरसोली ता. जळगाव (वार्ताहर) – येथील बारी समाज माध्यमिक विद्यालयात रविवारी मोठ्या उत्साहात ३६ वर्षे जुने विद्यार्थी १९८८- ८९ या वर्षी ची बॅच चे माजी विद्यार्थीचा मेळावा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. ३६ वर्षानंतर शाळेतील मित्र-मैत्रिणींना राज्यभरात विखुरलेलेना एकत्र आणण्याचा दुग्धशर्करा योग वर्गातील विनोद कुलकर्णी, राजू बारी, तुकाराम तांदळे, मुकेश कुलकर्णी, गोरख अस्वार यांच्या रूपाने घडून आला.
तसेच त्याकाळचे शिक्षक व कर्मचारी यांना फोन केला असता शिक्षकांचे मन भरून आले. तर त्याकाळचे सु. बा. कळस्कर, के. डी. काटोले , कौतिक पाटील, श्रावण बारी, वसंत भारुडे हे सर्व यावेळी उपस्थित होते. ३६ वर्षानंतर सर्व मित्र-मैत्रिणी आणि शिक्षक एकत्र जमा झाल्याने सर्वांचे जुन्या आठवणीना उजाळा मिळाला. यावेळी सर्वांचे डोळे भरून आले.
आजच्या धकाधकीच्या आणि संसाराच्या जीवन जगताना शालेय जीवन काय असते याची सर्वांना प्रचिती आली ज्या विद्यालयातून आपण घडलो आणि आपण शिकत असताना आपणाला कोणकोणत्या अडचणींचा सामना करावा लागला तसेच क्रीडा साहित्य आणि क्रीडा योजनांची कमतरता राहिली तशी कमतरता विद्यालयातील विद्यार्थ्यांना आम्ही होऊ देणार नाही याची जबाबदारी क्रीडा विभागात असलेल्या विनोद कुलकर्णी या माजी विद्यार्थ्यांनी घेतली.
सर्व माजी विद्यार्थी हे शासकीय, निम शासकीय, व्यावसायिक, व शेतकरी या दर्जातील होते. या सर्वांनी यावेळी आपला परिचय करून दिला. यावेळी पुन्हा दहावीचा वर्ग भरवण्यात आला. तसेच यावेळी खो-खो खेळण्याचा ही आनंद घेण्यात आला. या कार्यक्रमासाठी शाळेचे चेअरमन अर्जुन काटोले आणि शाळेचे मुख्याध्यापक राजेंद्र आंबटकर सर इत्यादी उपस्थित होते. यांनीही यावेळी आपले मनोगत व्यक्त केले. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विपिन कुलकर्णी यांनी केले.
या कार्यक्रमासाठी माजी विद्यार्थी संगीता ठाकूर, बेबी बारी, कलाबाई बारी, भीमराव कोळी, मुकेश कुलकर्णी, विपिन कुलकर्णी, संजय मराठे, गोपाल पाटील, प्रवीण पाटील, वाल्मीक पाटील, विजय पाटील, संभाजी पवार, अशोक सपकाळे, विठ्ठल साठे, संजय सोनार, संजय सोनवणे, तुकाराम तांदळे, गोरख अस्वार, अरुण बारी, देविदास बारी, जगदीश बारी, राजेंद्र बारी, रवींद्र बारी, राजू बारी, विश्राम बारी, अनिल बोबडे, संजय बोबडे, ज्ञानेश्वर ढेगळे, संजय फुसे, ज्ञानेश्वर सुरवाडे, सुनील तांदळे, बापू गवळी, इ. उपस्थित होते.