“जीएमसी”च्या वैद्यकीय पथकाचे यश
जळगाव (प्रतिनिधी) : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, जळगाव येथे एक ६० वर्षीय रुग्ण उपचारासाठी दाखल होता. मात्र त्याचे कुठलेच नातेवाईक रुग्णालयात आले नाही. त्यामुळे रुग्णालयाच्या वैद्यकीय पथकानेच उपचार पूर्ण झाल्यावर समाजसेवक इसाक बागवान यांच्या मदतीने त्यांना अधिष्ठाता डॉ. गिरीश ठाकूर यांच्या उपस्थितीत सुखरूप घरी रवाना केले.
यशवंत पुंजा सपकाळे (वय ६० वर्ष, रा. पिंप्री ता. यावल) हे आजारी असल्याने उपचारासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे दाखल झाले होते. दाखल झाल्यापासून संबंधित रुग्णाचे नातेवाईक कोणीही आले नाही. तरी रुग्णालयाने त्याचा योग्य प्रकारे उपचार करून त्यांच्या गावी पाठवण्यात आले.
रुग्णास रुग्णालयातून अधिष्ठाता डॉ गिरीश ठाकूर यांच्या उपस्थितीत निरोप देण्यात आला. यावेळी उप वैद्यकीय अधीक्षक इम्रान पठाण, समाजसेवा अधीक्षक अनिल ठाकरे, बी. एस. पाटील, समाजसेवक इसाक बागवान, आरोग्य कर्मचारी शकील पठाण इत्यादी उपस्थित होते.