जळगाव तालुक्यातील भोकर येथील घटना
आत्माराम प्रल्हाद सपकाळे (४५, रा. भोकर, ता. जळगाव) असे मयत व्यक्तीचे नाव आहे. गावात ते परिवारासह राहत होते. तालुक्यातील भादली गावात झालेल्या एका घटनेप्रकरणी तालुका पोलिस ठाण्यात दोन अल्पवयीन मुलांसह सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल असून यात भोकर येथील हर्षल आत्माराम सपकाळे (१८) याचाही समावेश आहे.
त्याला ३ ऑक्टोबर रोजी अटक करण्यात आले होते. या नंतर त्याचे वडील आत्माराम सपकाळे यांनी ५ ऑक्टोबर रोजी घराच्या दुसऱ्या मजल्यावर जाऊन गळफास घेतला. हा प्रकार लक्षात आल्यानंतर त्यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी मयत घोषित केले. यावेळी कुटुंबीयांनी एकच आक्रोश केला. या प्रकरणी तालुका पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.