• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

कंडारी : जितेंद्र कोळी हत्याप्रकरणी तिघे संशयित आरोपींना अटक

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
October 6, 2025
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
कंडारी : जितेंद्र कोळी हत्याप्रकरणी तिघे संशयित आरोपींना अटक


जळगाव एलसीबीसह भुसावळ शहर पोलिसांची कामगिरी

भुसावळ ( प्रतिनिधी ) – तालुक्यातील कंडारी परिसरात रविवारी दि. ५ ऑक्टोबर रोजी रात्रीच्या सुमारास १० ते ११ वाजेच्या दरम्यान किरकोळ वादातून तरुणाचा धारदार शस्त्राने खून करण्यात आला. पोलिसांनी अवघ्या काही तासांत सर्व संशयित आरोपींना अटक केली आहे.

या हत्येत मृत झालेल्या तरुणाचे नाव जितेंद्र राजेंद्र साळुंखे (कोळी, वय ४०, रा. गेंदालाल मिल परिसर, जळगाव) असे आहे. जितेंद्र हातमजुरी करून पत्नी आणि तीन मुलांसोबत आपला उदरनिर्वाह करत होता. जितेंद्र हा जळगाव शहरातील तीन परिचित व्यक्तींसोबत भुसावळ तालुक्यातील कंडारी गावात एका वैयक्तिक कामानिमित्त गेला होता. रात्री उशिरा चौघेही एका हॉटेलवर बसून मद्यपान करत असताना त्यांच्यात काही किरकोळ कारणावरून वाद सुरू झाला. वाद काही क्षणांतच चकमकीत परिवर्तित झाला आणि तिघा आरोपींनी मिळून जितेंद्रवर धारदार शस्त्राने वार केले.

जखमी अवस्थेत त्याला तातडीने भुसावळ येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र डॉक्टरांनी तपासणीअंती त्याला मृत घोषित केले. पोलिसांनी तातडीने घटनास्थळ गाठून पंचनामा सुरू केला आणि आरोपींचा शोध घेण्यासाठी मोठी मोहीम हाती घेतली. घटनेची माहिती मिळताच डॉ. महेश्वर रेड्डी (पोलीस अधीक्षक, जळगाव) यांनी राहुल गायकवाड (वरिष्ठ पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, जळगाव) यांना आदेश दिले.

स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक राहुल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली एक विशेष पथक तयार करण्यात आले. या पथकात पीएसआय गोरे, पो.कॉ सिद्धेश डापकर, रतन गीते, सलीम तडवी, मयूर निकम, किशोर पाटील, उमाकांत पाटील, प्रशांत परदेशी, राहुल नरवाडे, हेमंत पाटील, ईश्वर पाटील आणि शनिपेठ पोलीस स्टेशनचे कर्मचारी योगेश साबळे यांचा समावेश होता. या पथकाने रात्रभर प्रयत्न करून गोपनीय माहितीच्या आधारे जळगाव शहरातील शिवाजीनगर परिसरातून दोन संशयित आरोपींना अटक करण्यात यश मिळवले.

यात राजू  उर्फ बाबू अशोक सपकाळे (वय ३८, रा. कांती चौक, शिवाजी नगर, जळगाव) आणि मयूर उर्फ विक्की दिपक अलोने (वय ३२, रा. बारसे नगर, शिवाजी नगर, जळगाव) यांना अटक झाली. दरम्यान, भुसावळ शहर पोलीस निरीक्षक उद्धव डमाळे यांनी स्वतंत्र पथक तयार करून तिसऱ्या आरोपीचा शोध सुरू ठेवला. त्यांच्या मार्गदर्शनाखाली काम करणाऱ्या पथकाने तपासाच्या दिशेने निर्णायक हालचाल करत संशयित दीपक वसंत शंखपाळ (रा. कंडारी, ता. भुसावळ) या तिसऱ्या आरोपीला अटक करण्यात यश मिळवलं.

या कारवाईत भुसावळ शहर पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि कर्मचारी यांनी देखील महत्त्वाची भूमिका बजावली. दोन्ही पथकांनी रात्रभर अथक परिश्रम घेऊन तीनही आरोपींना ताब्यात घेतले आहे.  भुसावळ शहर पोलीस ठाण्यात या प्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. सर्व आरोपींची कसून चौकशी केली जात आहे.


 

 

Tags: kandari-jitendra-koli-hatya-3-atksthanik gunhe shakha news karvai
Previous Post

सामाजिक कार्यकर्ते मनोज वारके स्मरणार्थ शिबिरात ४५ जणांचे रक्तदान, १३० नागरिकाची आरोग्य तपासणी

Next Post

दारू पिणाऱ्यांना हटकल्याने रेल्वे कर्मचाऱ्यावर चाकू हल्ला

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
गावठी पिस्तूल, जिवंत काडतूस बाळगणाऱ्या तरुणावर कारवाई

दारू पिणाऱ्यांना हटकल्याने रेल्वे कर्मचाऱ्यावर चाकू हल्ला

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

 रावेर पोलिसांची धडाकेबाज कारवाई; अमरावतीतील ट्रकचालक हत्येप्रकरणातील संशयित पंजाबला पळण्याआधी जेरबंद
1xbet russia

 रावेर पोलिसांची धडाकेबाज कारवाई; अमरावतीतील ट्रकचालक हत्येप्रकरणातील संशयित पंजाबला पळण्याआधी जेरबंद

July 17, 2026
जळगाव-उमाळा घाटात कारची नादुरुस्त ट्रकला भीषण धडक; दोन तरुणांचा जागीच मृत्यू, पाच गंभीर
1xbet russia

जळगाव-उमाळा घाटात कारची नादुरुस्त ट्रकला भीषण धडक; दोन तरुणांचा जागीच मृत्यू, पाच गंभीर

July 17, 2026
नोकरीचे आमिष देऊन मेघालयच्या तरुणीवर अत्याचार
1xbet russia

महिलेवर सामूहिक लैंगिक अत्याचार ; फत्तेपूर पोलिसांत चार जणांविरुद्ध गुन्हा

July 16, 2026
५० वर्षीय रुग्णाच्या स्किझोफ्रेनिया आजारावर यशस्वी उपचार
1xbet russia

राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाच्या एसीएमसी अभ्यासक्रमात डॉ. बापूराव बीटे यांचा सहभाग

July 16, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

 रावेर पोलिसांची धडाकेबाज कारवाई; अमरावतीतील ट्रकचालक हत्येप्रकरणातील संशयित पंजाबला पळण्याआधी जेरबंद

 रावेर पोलिसांची धडाकेबाज कारवाई; अमरावतीतील ट्रकचालक हत्येप्रकरणातील संशयित पंजाबला पळण्याआधी जेरबंद

July 17, 2026
जळगाव-उमाळा घाटात कारची नादुरुस्त ट्रकला भीषण धडक; दोन तरुणांचा जागीच मृत्यू, पाच गंभीर

जळगाव-उमाळा घाटात कारची नादुरुस्त ट्रकला भीषण धडक; दोन तरुणांचा जागीच मृत्यू, पाच गंभीर

July 17, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon