भुसावळ;- शहरातील रजा कॉलनी भागात १० लाखांच्या चोरी प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून यातील दोघांना पोलिसांनी अटक केली असून त्यातील तीन आरोपी फरार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
शहरातील खुशतर हाऊस रजा नगरात राहणारे डॉक्टरासह कुटुंबातील सर्व सदस्य कोवीड केअर सेंटरमध्ये २४ मे ते १ जून पर्यंत क्वारंटाईन झाले होते. त्यामुळे घराला कुलूप लावून सील करण्यात आले होते. याचा फायदा अज्ञात चोरट्यांनी या कालावधील घराच्या बेडरूमच्या खिडकीचे ग्रिल उचकावून घरात प्रवेश करत ४ लाख रूपये किंमतीचे सोन्याचांदीचे दागीने व इतर वस्तू असा एकुण १० लाख ९० हजार ९०० रूपयांचा मुद्देमाल लंपास केला होत. याप्रकरणी भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात भाग-५, गुरनं ५८८/२०२० भादवी ३८०, ४५४, ४५७ प्रमाणे गुन्हा नोंदविण्यात आला होता.
यांच्या पथकाने केली कारवाई
गुन्हा दाखल होताच पोलीस अधीक्षक डॉ. पंजाबराव उगले, अपर पोलीस अधीक्षक भाग्यश्री नवटके, विभागीय पोलीस अधिकारी गजानन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबी पो.नि. बापु रोहम व भुसावळ बाजार पेठ पोलीस स्टेशनचे पो.नि. दिलीप भागवत यांनी एलसीबीचे पथक तयार केले. त्यात स.फौ. राजेंद्र पाटील, पोहेकॉ. अनिल इंगळे, रमेश चौधरी, युनूस शेख, संतोष मायकल, रणजित जाधव, पोहेकॉ राजेंद्र पवार यांना भुसावळ येथे रवाना केले होते.
सापळा रचून झाली अटक
स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळालेल्या माहितीनुसार घरफोडी करणारे संशयित आरोपी आकाश सुरेश मोरे (वय-२५)रा. घोडे पीर नगर आणि शेख मेहबुब शेख इमाम (वय-६०) रा. दिन दयाळ नगर यांना अटक केली. दरम्यान रजा नगरातील केलेली घरफोडीची कबुली दिली आहे. गुन्ह्यात वापरलेली स्कुटी दुचाकी आणि २ लाख ८६ हजार ४०० रूपये हस्तगत केले आहे. दरम्यान घरफोडीत सहभागी असलेले साथीदारअनिस शेख रशीद रा. जाम मोहल्ला, भुसावळ, अल्तमस शेख रशिद रा. जाम मोहल्ला, भुसावळ, जहीर (पुर्ण नाव माहिती नाही) रा. मुस्लिम कॉलनी, भुसावळ हे तिघे फरार आहेत. पुढील कारवाईसाठी संबंधित दोन्ही आरोपींना भुसावळ बाजारपेठ पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.







