जळगावातील पिंप्राळा भागात गणपती नगर येथे घडली घटना
जळगाव ( प्रतिनिधी ) – शहरातील पिंप्राळा भागातील गणपती नगर येथे एका विद्यार्थ्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना गुरुवारी दि. २ ऑक्टोबर रोजी रात्री १२:३० वाजता उघडकीस आली. रुग्णालयात कुटुंबीय व नातेवाईकांनी मन हेलावणारा आक्रोश केला. या प्रकरणी रामानंद नगर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
कृष्णा राहुल सोनवणे (१६) असे तरुण विद्यार्थ्याचे नाव आहे. तो इयत्ता अकरावीमध्ये शिकत होता. कृष्णा याचे आई-वडील विभक्त झाले असून वडील मुंबईला तर आई पिंप्राळा हुडको परिसरात राहते. कृष्णा व त्याचा मोठा भाऊ हे मुंबई येथे वडिलांकडेच राहतात.(केसीएन)तेथेच कृष्णा हा इयत्ता अकरावीला होता. दोन दिवसांपूर्वीच आईला भेटण्यासाठी आला होता. दरम्यान रात्री राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली.
हा प्रकार कुटुंबीयांच्या लक्षात येताच त्याला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे डॉक्टरांनी तपासून मयत घोषित केले. यावेळी कुटुंबीयांनी मन हेलावणारा आक्रोश केला. रुग्णालयात नातेवाईक व मित्रपरिवाराची प्रचंड गर्दी झाली होती. घटनेमुळे कुटुंबीयांना मानसिक धक्का बसला आहे. याबाबत रामानंदनगर पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.