जळगाव शहरातील दीक्षितवाडी येथील घटना
प्रणाली किरण बारी (२९, रा. दीक्षितवाडी) या २५ सप्टेंबरला रात्री देवीच्या आरतीसाठी जाताना सोन्याची पोत घालून गेल्या होत्या. तेथून परतल्यानंतर त्यांनी ती मंगलपोत कपाटातील ड्रॉवरमध्ये ठेवली. २७ सप्टेंबर रोजी कपाटाचे लाकडी ड्रॉवर खाली पडले. यावेळी त्यांना ड्रॉवरमध्ये ठेवलेली मंगलपोत दिसली नाही. शोध घेऊनही मंगलपोत न सापडल्याने महिलेने जिल्हापेठ पोलिसात फिर्याद दिली. याप्रकरणी ३० सप्टेंबर रोजी जिल्हापेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.