रावेर तालुक्यातील अजंदे शिवारातील घटना
रावेर ( प्रतिनिधी ) – तालुक्यातील विवरे बुद्रुक येथे राहणाऱ्या तरुणाने त्याच्या सासरी जाऊन अजंदे शिवारात झाडाला गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे याबाबत संबंधित पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
तालुक्यातील विवरे बुद्रूक येथील अफजल रमा तडवी (वय २१) असे मयत तरुणाचे नाव आहे. त्याने भोकरी येथे सासरी असताना सोशल मीडियावर स्टेटस ठेवून अजंदे रस्त्यावरील केळीच्या बागेतील रामफळाच्या फांदीवर गळफास घेऊन आत्महत्या केली. अफजल हा पत्नी सानिया सोबत सासरी २९ रोजी गेला होता. दरम्यान, १ सप्टेंबर रोजी त्याने त्याच्या मोबाईलवर ‘आज मी आत्महत्या करीत आहे व त्यास मी स्वतःच जबाबदार राहील.’ असा संदेश देत आत्महत्या केल्याची घटना दुपारी ४: २५ वाजेच्या सुमारास उघडकीस आली. याबाबत संबंधित पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आले आहे.