चोपडा तालुक्यातील पारगाव येथील घटना
जळगाव (प्रतिनिधी) : तालुक्यातील पारगाव येथील ग्रामपंचायतच्या इमारतीचे साफसफाई करत असताना तोल जाऊन खाली पडल्याने ग्रामपंचायत सफाई कर्मचाऱ्यांचा उपचारादरम्यान जळगाव येथील खाजगी रुग्णालयात मृत्यू झाल्याची घटना बुधवारी १ ऑक्टोबर रोजी पहाटे ५ वाजता घडली आहे. या संदर्भात पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.
युवराज सेना नाडे (वय ६०, रा. देवगाव ता. चोपडा) असे मयत सफाई कर्मचाऱ्यांचे नाव आहे. देवगाव येथिल रहीवासी असुन ते पारगाव ग्रामपंचायत येथे साफसफाई कर्मचारी म्हणून नोकरीला होते. दरम्यान ४ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता ग्रामपंचायत इमारतीचे साफसफाईचे कामगारांसाठी ते गच्चीवर गेले होते. त्यावेळी साफसफाई करत असताना त्यांचा तोल जाऊन ते खाली पडले. त्यात ते गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने जळगाव येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.
त्यांच्यावर उपचार सुरू असताना बुधवारी १ ऑक्टोबर रोजी पहाटे ५ वाजता त्यांची प्राणज्योत मालविली. या घटने संदर्भात पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.