अमळनेर तालुक्यातील टाकरखेडा रस्त्यावरील घटना
अमळनेर ( प्रतिनिधी ) – सती मातेचं दर्शन घेऊन घरी परतणाऱ्या दाम्पत्यावर टाकरखेडा रोडवर काळाने घाला घातला. रस्त्यात गाय आडवी आल्याने मोटरसायकलची धडक लागल्याने दुचाकीस्वार जखमी होऊन त्यांची पत्नी मयत झाल्याची घटना दि. ३० सप्टेंबर रोजी दुपारी २ वाजून १० मिनिटांनी टाकरखेडा रस्त्यावर बुलढाणा अर्बन बँकेच्या गोदामसमोर घडली.
नवरात्रोत्सव व अष्टमीचा दिवस असल्याने मधुकर नारायण ठाकरे (रा. आर. के. नगर) हा त्याची पत्नीला घेऊन मोटरसायकल क्रमांक (एमएच १९ डीएन ८५१४) हिच्यावर सती मातेच्या दर्शनाला घेऊन गेला होता. परत येताना गाय अचानक आडवी आल्याने दुचाकीला वेग नियंत्रित न झाल्याने धडक लागली आणि दुचाकी खाली पडून मधुकरची यांच्या पत्नी मंगलाबाई हिच्या डोक्याला मार लागला. तर मधुकर पाटील याच्या तोंडाला मार लागला आहे.
मधुकर पाटील यांना खाजगी दवाखान्यात उपचारासाठी दाखल केले. तर मंगलाबाई यांना डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. अशोक ठाकरे यांच्या फिर्यादीवरून अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास हेडकॉन्स्टेबल गणेश पाटील करीत आहेत.