राज्यातील ३६ आरोग्य संस्थांचा समावेश : जिल्हा आरोग्य अधिकारी डाॅ. भायेकर यांच्या प्रयत्नांना यश
जळगाव (प्रतिनिधी) : राज्यातील ३६ आरोग्य संस्थां ह्या राष्ट्रीय गुणवत्ता हमी मानके (एनक्यूएएस) यासाठी यावर्षी पात्र ठरल्या आहेत. यात जळगाव जिल्ह्य़ातील चाळीसगाव तालुक्यातील टाकळी प्र. चा. येथील आरोग्यवर्धिनी उपकेंद्र याचाही यात समावेश आहे.

जिल्हा परिषद जळगावच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल, जिल्हा आरोग्य अधिकारी डाॅ सचिन भायेकर, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डाॅ धापटे, जिल्हा स्तरीय पर्यवेक्षण अधिकारी डाॅ बाळासाहेब वाबळे, चाळीसगाव तालुका आरोग्य अधिकारी डाॅ प्रशांत बोरसे यांच्या मार्गदर्शनाखाली पातोंडा आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डाॅ. मोहन राठोड, समुदाय आरोग्य अधिकारी डाॅ. संगीता लव्हारे यांच्यासह आरोग्य कर्मचारी वृंद यांनी परिश्रम घेतल्याने राष्ट्रीय पातळीवर टाकळी प्र. चा. येथील आरोग्य संस्था पाञ ठरली आहे.
आता राष्ट्रीय प्रमाणपञ प्राप्त करून नावलौकिक वाढविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे डाॅ सचिन भायेकर यांनी सांगितले. येत्या काळात जिल्ह्य़ातील अनेक आरोग्य संस्था राष्ट्रीय गुणवत्ता हमी मानके (एनक्यूएएस) साठी राज्य व राष्ट्रीय पातळीवर पाञ ठरतील असे त्यांनी नमूद करून अभिनंदन केले आहे. हे भारत सरकारच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयद्वारे सार्वजनिक आरोग्य सुविधांची गुणवत्ता सुधारण्यासाठी आणि त्यांची विश्वासार्हता वाढवण्यासाठी विकसित केलेले एक व्यापक फ्रेमवर्क आहे.
राष्ट्रीय गुणवत्ता हमी मानके (एनक्यूएएस) ची वैशिष्ठे आहेत. यात सेवांची गुणवत्ता सुनिश्चित करणे: सार्वजनिक आरोग्य सेवा सुरक्षित, रुग्ण-केंद्रित आणि उच्च दर्जाच्या आहेत याची खात्री करणे, सुविधांची ओळख पटवणे, चांगली कामगिरी करणाऱ्या सुविधांना प्रोत्साहन देणे. रुग्णालयांची विश्वासार्हता वाढवणे, समुदायातील सार्वजनिक रुग्णालयांवरील लोकांचा विश्वास वाढवणे असे उद्दिष्ट्य ठेवले जातात.
सार्वजनिक आरोग्य सुविधांसाठी तसेच जागतिक सर्वोत्तम पद्धतींसाठी विशिष्ट आवश्यकता लक्षात घेऊन राष्ट्रीय गुणवत्ता आश्वासन मानके विकसित करण्यात आली आहेत. राष्ट्रीय गुणवत्ता हमी मानके (एनक्यूएएस) सध्या जिल्हा रुग्णालये, आरोग्य केंद्रे आणि शहरी आरोग्य केंद्रेसाठी उपलब्ध आहेत. मानके प्रामुख्याने प्रदात्यांसाठी पूर्वनिर्धारित मानकांद्वारे सुधारणेसाठी त्यांच्या स्वतःच्या गुणवत्तेचे मूल्यांकन करण्यासाठी आणि त्यांच्या सुविधा प्रमाणनासाठी आणण्यासाठी आहेत. राष्ट्रीय गुणवत्ता आश्वासन मानके 8 “चिंतेचे क्षेत्र” अंतर्गत व्यापकपणे व्यवस्थित केली आहेत – सेवा तरतूद, रुग्णांचे हक्क, इनपुट, समर्थन सेवा, क्लिनिकल केअर, संसर्ग नियंत्रण, गुणवत्ता व्यवस्थापन आणि परिणाम. हे मानके ISQUA मान्यताप्राप्त आहेत आणि व्यापकता, वस्तुनिष्ठता, पुरावे आणि विकासाच्या कठोरतेच्या बाबतीत जागतिक बेंचमार्क पूर्ण करतात.









