जळगावात आर. आर. विद्यालयात आयोजन
जळगाव (प्रतिनिधी) : येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातर्फे “स्वस्थ नरी, सशक्त परिवार” अभियान अंतर्गत शहरातील आर. आर. विद्यालयात किशोरवयीन मुलींसाठी मासिक पाळी स्वच्छता आणि एचपीव्ही लसीकरण जागरूकता शिबिर घेण्यात आले.
या शिबिरात एकूण १०४ किशोरवयीन शालेय मुलींनी सहभाग घेतला. शिबिरात मासिक पाळी स्वच्छता, एचपीव्ही संसर्ग, गर्भाशयाच्या कर्करोगापासून बचाव आणि एचपीव्ही लसीकरण यावर लक्ष केंद्रित केले गेले. यासाठी अधिष्ठाता डॉ. गिरीश ठाकूर, उप अधिष्ठाता डॉ. मारोती पोटे यांचे मार्गदर्शन लाभले. या शिबिराचे संचालन अभियानाच्या नोडल अधिकारी तथा जनऔषध वैद्यकशास्त्र विभागप्रमुख डॉ. योगिता बावसकर यांनी केले.
शिबिरात डॉ. योगिता बावसकर यांचेसह डॉ. अमृता शास्त्री, डॉ. शाहिद हमीद, डॉ. उत्कर्ष वशिष्ठ, चेतन पाटील यांनी विद्यार्थिनींना मार्गदर्शन केले. प्रसंगी विद्यालयातील मुख्याध्यापक व शिक्षक वृंद मोठ्या संख्येने उपस्थित होते.