यावर्षी होती थीम : डोन्ट मिस अ बीट
जळगाव ( प्रतिनिधी ) – येथील गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंगमध्ये जागतिक हदयरोग दिनानिमीत्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंग, जळगाव येथील मेडिकल-सर्जिकल नर्सिंग विभागातर्फे जागतिक हृदय दिन २०२५ विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला. यावर्षीचा जागतिक थीम डोन्ट मिस अ बीट यावर आधारित कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.या उपक्रमांतर्गत जनजागृती रॅली, प्रातिनिधिक नाटिका तसेच बेसिक सीपीआर प्रात्यक्षिक विद्यार्थ्यांनी सादर केले. हृदयविकाराचे लवकर निदान करण्याचे महत्त्व, अस्वस्थ जीवनशैलीचे दुष्परिणाम आणि लहान-सहान सवयींमध्ये बदल केल्यास होणारे सकारात्मक परिणाम याबद्दल प्रभावी संदेश देण्यात आला.या कार्यक्रमामुळे समाजातील नागरिकांमध्ये हृदय आरोग्याबाबत जागरूकता निर्माण झाली तसेच सीपीआरसारख्या जीव वाचवणार्या तंत्रज्ञानाचे प्रत्यक्ष प्रशिक्षण मिळाले. विद्यार्थ्यांचा उत्साह, शिक्षकांचे मार्गदर्शन आणि समुदायाचा सक्रिय सहभाग यामुळे हा दिवस अर्थपूर्ण व यशस्वी ठरला.