पिंपळगाव हरेश्वर पोलीसांची कारवाई
पाचोरा ( प्रतिनिधी ) – पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील कुऱ्हाड तांडा येथील एका २९ वर्षीय तरुणाला अवैधरित्या तलवार बाळगल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पाचोरा तालुक्यातील कुऱ्हाड तांडा येथील रहिवासी अर्जून किसन बंजारा याने गावात दहशत निर्माण करण्याच्या उद्देशाने त्याच्या घरात तलवार बाळगून आहे व एखाद्यावेळी त्याच्याकडून मोठा गुन्हा घडण्याची शक्यता नाकारता येत नाही अशी गोपनीय माहिती पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशनच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक कल्याणी वर्मा यांना मिळाली होती.
या मिळालेल्या माहितीची खात्री करुन घेण्यासाठी पोलीस हेडकॉन्स्टेबल अतुल पवार, शैलेश चव्हाण, पोलीस कॉन्स्टेबल अमोल पाटील, प्रमोद वाडिले यांना पाठवले असता त्यांनी अर्जून किसन बंजारा याला ताब्यात घेतले व विश्वासात घेऊन तलवारीबाबत विचारपूस केली असता त्याने तलवार असल्याचे कबुल करत ती तलवार पत्र्याच्या कोठीत ठेवली आहे असे सांगितले व कबूली देत दोन पंचासमोक्ष पत्र्याच्या कोठीत ठेवलेली तलवार पोलीस हेडकॉन्स्टेबल अतुल पवार यांना काढून दिली. याबाबत कुऱ्हाड तांडा येथील रहिवासी अर्जून किसन बंजारा (वय वर्षे २९) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून सहाय्यक पोलीस निरीक्षक कल्याणी वर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेडकॉन्स्टेबल अतुल पवार हे पुढील तपास करीत आहेत.