पाचोरा शहरातील पुलाजवळ घटना ; शोधकार्य सुरु
पाचोरा (प्रतिनिधी) : नदीला आलेल्या पुराच्या पाण्यात पुलावरून उडी मारून घेणाऱ्या १ व्यक्ती बेपत्ता झाल्याची घटना आज दि. २२ सप्टेंबर रोजी दुपारी १२ वाजेच्या सुमारास घडली आहे. घटनेप्रकरणी पाचोरा पोलीस स्टेशनला नोंद घेण्याचे काम सुरु असून सदर व्यक्तीला शोधण्याचे काम सुरु होते. याबाबतचा व्हिडिओ देखील व्हायरल होत आहे.
प्रकाश पाटील (वय ६०, रा. जारगाव ता. पाचोरा) असे बेपत्ता व्यक्तीचे नाव आहे. त्यांचे परिवारात १ मुलगा, १ मुलगी असा परिवार आहे. ते जारगाव गावातील ग्रामपंचायत घंटागाडीवरील कर्मचारी आहेत. गेल्या २ दिवसांपासून हिवरा नदीपात्रात पुर आला आहे. शहरातील एका पुलानजीक ते गेले होते. तेथे पुलावर नदीच्या दिशेने उभे राहले. अनेकांनी त्यांना मज्जाव केला.(केसीएन) याबाबत कोणीतरी याबाबत व्हिडीओ बनवला आहे.काही वेळाने प्रकाश पाटील यांनी पुराच्या पाण्यात उडी घेतली. मात्र पुराचे पाणी भरपूर असल्याने प्रकाश पाटील हे वाहून गेले. यावेळी एकच धावपळ उडाली. यावेळी प्रकाश पाटील यांना काढण्यासाठी प्रयत्न झाले. मात्र ते दूरवर वाहून गेल्याचे दिसून आले. यावेळी पोलिसांसह ग्रामस्थ घटनास्थळी आले. याबाबत पोलीस घटनेची नोंद घेत असून शोधमोहीम सुरु आहे.