अमळनेर तालुका येथे मेहेरगाव येथील घटना
अमळनेर (प्रतिनिधी) : तालुक्यातील मेहरगाव येथे पाणीपुरवठ्यासाठी मोटर चालू करायला ग्रामपंचायतचे शिपाई गेले असताना त्यांना विजेचा जबर धक्का लागून ते गंभीर जखमी झाले आहे.
प्रफुल्ल श्रीधर पाटील (वय ३८) हे जखमी झाले आहेत. त्यांना तात्काळ अमळनेर येथील नर्मदा फाउंडेशन येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले. एकटाच कमावता व्यक्ती असल्याने घरची परिस्थिती बेताचीच असल्याने ग्रामपंचायत कर्मचारी संघटनेकडून पाच हजार रुपयांची मदत करण्यात आली. यावेळी विभागीय सचिव सुभाष पाटील, तालुकाध्यक्ष नरेंद्र पाटील, सचिव सुभाष पाटील आदी उपस्थित होते. शासनासह मेहरगाव ग्रामपंचायत व गावातील दानशूर व्यक्तींनी मदतीचा दात द्यावा असे आवाहन संघटनेच्या वतीने करण्यात आले.









