अध्यक्षपदी गिरीश भोळे, उपाध्यक्ष हितेश जावळे यांची निवड
जळगाव (प्रतिनिधी): श्री हरी मंदिर प्रतिष्ठान संचालित नवदुर्गा मित्र मंडळाने यंदाही नवरात्रोत्सवाचे उत्कृष्ट आयोजन केले आहे. मंडळाने बुऱ्हाणपूर येथून आणलेली आकर्षक आणि पर्यावरणपूरक अशी माता अन्नपूर्णा देवीची मातीची मूर्ती प्रतिष्ठापित केली जाणार आहे. मंडळाच्या अध्यक्षपदी गिरीश भोळे, उपाध्यक्ष हितेश जावळे यांची निवड करण्यात आली आहे.
मंडळाचे नूतन अध्यक्ष गिरीश भोळे यांच्या मार्गदर्शनाखाली दरवर्षीप्रमाणे यंदाही भव्य दांडिया रासचे आयोजन करण्यात आले आहे. ‘मेलोडी सुपरहिट ऑर्केस्ट्रा’ तर्फे गुजरातहून विशेष गायकांना आमंत्रित करण्यात आले आहे, त्यामुळे दांडियाचा उत्साह शिगेला पोहोचला आहे. दरवर्षी दररोज सायंकाळी ७ ते १० या वेळेत होणाऱ्या दांडिया रासमध्ये सहभागी होणाऱ्या स्पर्धकांसह प्रेक्षकांचीही मोठी गर्दी दिसून येते. या दांडिया रासमध्ये विजेत्या स्पर्धकांना मंडळाकडून आकर्षक बक्षिसे दिली जाणार आहे. याव्यतिरिक्त, मंडळातर्फे दररोज सकाळी आणि संध्याकाळी ८ वाजता देवीची महापूजा व आरती मान्यवरांच्या हस्ते केली जाणार आहे. नवरात्रोत्सवाच्या काळात रक्तदान शिबिर यांसारखे सामाजिक उपक्रमही राबवले जाणार आहे. तसेच, दरवर्षीप्रमाणे भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजनही करण्यात आले आहे.
मंडळाची कार्यकारिणी
संस्थापक अध्यक्ष : कैलास भोळे, अध्यक्ष : गिरीश कैलास भोळे, उपाध्यक्ष : हितेश जावळे, सचिव : सुरज चौधरी, संघटक : रितेश पाटील, खजिनदार : जयंत राणे, नियोजन समिती : उषाताई बेहरे, ज्योतीताई पाटील, सल्लागार समिती: शैलेंद्र पाटील, मुकेश महाजन, शेखर चौधरी, जितू भोळे, पवन शिरसाळे, मयूर भोळे, पंकज पाटील, विनोद महाजन, सदस्य : कुशल महाजन, विष्णू पाटील, तेजस राजपूत, प्रथमेश अमृतकर, योगेश अत्तरदे, विशाल वराडे, पंकज गोपाळ, शुभम पाटील, अंकुश पाटील, नीरज चौधरी, यज्ञेश चौधरी, अनिल भोळे.