जळगाव एलसीबीची कारवाई
जळगाव (प्रतिनिधी) : गुजरात येथील एका फरार अट्टल गुन्हेगारास भुसावळात एलसीबीकडून अटक करण्यात आली आहे. मिळालेल्या गोपनीय माहीतीवरुन दि. १९ सप्टेंबर रोजी आरोपीस भुसावळ शहरात नहाटा चौफुलीजवळील महामार्गावर सापळा रचुन ताब्यात घेण्यात आले आहे.

साहील उर्फ सलीम पठान (वय-२१, रा- गुजरात) असे ताब्यात घेण्यात आलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. त्याच्यावर जबरी चोरी, घरफोडी, चोरी, आर्म अॅक्ट प्रमाणे गुन्हे दाखल आहेत. सुरत, गुजरात येथील निझर पोलीस स्टेशनमध्ये दाखल गुन्ह्याचा तपास सुरु असताना गुजरात पोलसांकडून समजले की, जबरी चोरीच्या गुन्हयातील फरार आरोपी साहील उर्फ सलीम पठान हा जळगाव जिल्हयात आला आहे. त्यानुसार, वरिष्ठ पोलीस निरिक्षक राहुल गायकवाड यांना मिळालेल्या गोपनीय माहीतीवरुन त्यांनी भुसावळ उपविभागातील स्थानिक गुन्हे शाखा पथकाला सुचना दिल्या. पथकाने दि. १९ सप्टेंबर रोजी सपळा रचत शहरातील नहाटा चौफुलीजवळील महामार्गावर संशयिताला ताब्यात घेतले.
सदरची कारवाई माहेश्वर रेडडी सो, पोलीस अधीक्षक, जळगांव, अप्पर पोलीस अधिक्षक अशोक नखाते तसेच उपविभागीय अधिकारी संदीप गावीत यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरिक्षक राहुल गायकवाड, स्थागुशा जळगांव, पोउपनिरि शरद बागल, श्रे. पोउनिरि रवि नरवाडे, पोहेकॉ गोपाल गव्हाळे, पोहेकों उमाकांत पाटील, पोना विकास सातदिवे, पोकों प्रशांत परदेशी, पोकों राहुल वानखेडे यांनी केली आहे.









