अरुश्री परिवार, मुक्ती फाउंडेशनतर्फे महिलांसाठी मोफत आरोग्य शिबिर उत्साहात
जळगाव (प्रतिनिधी) : विश्वनेता, देशाचे लाडके प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त विशेष सेवा सप्ताह अंतर्गत स्वस्थ नारी सशक्त परिवार कार्यक्रमाचे आयोजन राष्ट्रकल्याणार्थ सामाजिक बांधिलकी जोपासत सामाजिक सेवाभावी संस्था मुक्ती फाउंडेशन व अरुश्री परिवार यांच्या माध्यमाने श्रीराम भवन येथील अरुश्री हॉस्पिटल येथे महिलांसाठी भव्य मोफत आरोग्य तपासणी, औषधोपचार,मार्गदर्शन शिबिराचे विशेष आयोजन करण्यात आले होते.
या आरोग्य शिबिरामध्ये महिला रुग्णांची डॉ .स्वाती परिक्षीत बाविस्कर एमडी मेडिसिन यांच्या टीमने हृदयरोग (हार्ट) ,रक्तदाब (बीपी),मधुमेह (डायबिटीस), थायरॉईड, जनरल तपासणी, फुप्फुस तपासणी फुफ्फुसीय कार्य चाचणी (Pulmonary Function Test)”आदीं तपासण्या केल्या. जवळपास २६७ महिलांनी लाभ घेतला. जळगाव लोकसभा क्षेत्राच्या खासदार स्मिताताई वाघ यांनी आरोग्य शिबिराला सदिच्छा भेट देत आयोजकांचे कौतुक केले. तसेच त्यांनी सुदृढ राष्ट्राकरिता महिला सशक्तिकरण कार्य काळाची गरज असल्याचे सांगून महिलांनी आपल्या चांगल्या आरोग्यासाठी सदैव जागरूक राहिल्यास होणारे मोठे गंभीर आजार टाळता येतात, असे सांगितले.
आज समाजात अरुश्री हॉस्पिटलचे डॉ.परिक्षीत व डॉ.स्वाती बाविस्कर हे दांम्पत्य सामाजिक बांधिलकीतून अहंभाव न करता रुग्णांची मनोभावे सेवा करीत असतात. अशा मुळे समाज आरोग्याच्या दृष्टिकोनातून सुरक्षित आहे. यावेळी श्रीराम भवन परिसरात स्वच्छता अभियानही राबविण्यात आले. कार्यक्रमास अरुश्री हॉस्पिटल मधील सर्व स्टाफ यांचे सहकार्य लाभले. मुक्ती फाउंडेशनचे अध्यक्ष मुकुंद गोसावी यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आभार मानले.