जळगाव (प्रतिनिधी) – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त माजी खा. डॉ. उल्हास पाटील व डॉ. केतकी पाटील यांच्या संकल्पनेतून गोदावरी फाउंडेशनतर्फे १७ सप्टेंबरपासून स्वस्थ माता, सशक्त परिवार अभियानांतर्गत आरोग्य तपासणी व रक्तदान शिबीरांचे आयोजन करण्यात आले आहे.
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त आरोग्य सेवेचा उपक्रम हाती घेण्यात येत आहे. यात दि. १८ रोजी जळगाव जिल्हयातील कढोली, गारखेडा,अंतुर्ली येथे आरोग्य तपासणी आणि रक्तदान शिबीरात ३७७ नागरिकांची तपासणी करण्यात आली. तर मुक्ताईनगर येथील रक्तादान शिबिरात २७ दात्यांनी रक्त दिले. गोदावरी फाउंडेशनतर्फे डॉ. उल्हास पाटील वैद्यकिय महाविद्यालयातर्फे अधिष्ठाता डॉ. प्रशांत सोळंके,नोडल ऑफीसर वैद्यकिय अधिक्षक डॉ. प्रेमचंद पंडीत यांच्या मार्गदर्शनानुसार कढोलीत डॉ. रोहीत, डॉ. आवेश, अनिष,यांनी तर गारखेडा आणि अंतुर्लीत डॉ. प्राजक्ता, डॉ. अभिजित आणि डॉ. रश्मी यांनी तपासणी केली.या शिबिरासाठी रविंद्र तनवर, अमोल चौधरी, रितेश वारके, राज सोनवणे, लक्ष्मण पाटील, रूपेश कुळकर्णी, संदीप निकुंभ,भावेश शेळके, दिनेश भोळे, यश पाटील आणि यश वाघ यांनी परिश्रम घेतले.