डॉ.उल्हास पाटील वैद्यकिय महाविद्यालयाचा उपक्रम
जळगाव (प्रतिनिधी) – डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयामध्ये औषध दक्षता सप्ताहनिमीत्त औषध दक्षता – सामान्य चिकित्सकांमध्ये जागृती या विषयावर आधारित एकदिवसीय कार्यशाळा उत्साहात संपन्न झाली. दि. १७ सप्टेंबर २०२५ रोजी नॅशनल फार्माकोव्हिजिलन्स वीक’ म्हणजेच राष्ट्रीय औषध दक्षता सप्ताह. हा एक आठवडाभर चालणारा कार्यक्रम असतो, ज्यामध्ये औषध घेतल्यानंतर होणारे दुष्परिणाम किंवा इतर कोणत्याही औषधांशी संबंधित समस्यांबद्दल जनजागृती केली जाते. या एक दिवशीय कार्यशाळेमध्ये मुख्य उद्देश औषधांच्या सुरक्षिततेबद्दल समाजात जागरूकता वाढवणे,औषधाच्या दुष्परिणामाबद्दल किंवा अपायकारक परिणामाबद्दल जागृती निर्माण करणे हा होता. प्रास्ताविकर करतांना डॉ. बापूराव बिटे यांनी औषध दक्षता प्रस्तावना, औषधांचे दुष्परिणाम, दुष्परिणामांचे प्रकार, दुष्परिणाम ओळखणे व त्याची नोंद करणे यासंदर्भात मार्गदर्शन केले. डॉ. माया आर्वीकर यांनी महिलांच्या मध्ये औषधांची सुरक्षितता व औषधाचे दुष्परिणाम,डॉ. चंद्रया कांते यांनी उपस्थित चिकित्सकांना औषध सुरक्षा, परिणामकारकता व दुष्परिणाम ओळखणे व नमूद करणे यासंदर्भात मार्गदर्शन केले. दुपारच्या सत्रामध्ये डॉ. निलेश बेंडाळे यांनी औषधांची सामाजिक सुरक्षितता याची महती विशद केली. डॉ. अनंत बेंडाळे यांनी लहान मुलांच्या मध्ये होणारी लसीकरण औषधोपचार व त्याचे दुष्परिणाम व औषध सुरक्षिता यावर सविस्तर प्रबोधन केले. या कार्यशाळेत मध्ये ४० चिकित्सकांचा सहभाग होता. सदर कार्यशाळेचे प्रमाणपत्र वितरण मान्यवरांच्या उपस्थित झाले.यावेळी वैद्यकिय संचालक डॉ एन एस आर्वीकर,अधिष्ठाता डॉ प्रशांत सोळंके, प्रशासकिय अधिकारी प्रमोद भिरूड, डॉ चंद्रया कांते, डॉक्टर माया आर्वीकर, डॉ निलेश बेंडाळे, डॉ बापूराव बीटे यांच्या हस्ते उपस्थित होते. डॉ देवेंद्र चौधरी डॉ चंद्रकांते डॉ, बापूराव बीटे व नमिता उमेश हे या औषधे दक्षता सप्ताहाचे आयोजन करत आहेत डॉ. बापूराव बिटे यांनी आभार व्यक्त करून कार्यक्रमाची सांगता झाली.