पहुर- जामनेर तालुक्यातील पहूर कसबे गावातील प्रवीण पुंडलिक बोदडे वय 42 यांची देवळी शिवारातील शेतात मधून दिनांक 5 जून रोजी मध्यरात्री बैल जोडी चोरी झाली होती . या प्रकरणी पोलिस ठाण्यात फिर्यादी प्रवीण बोदडे यांच्या फिर्यादीवरून पहुर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राकेश सिंग परदेशी व त्यांचे सहकारी पोलीस उपनिरीक्षक अमोल दिवटे ,सहाय्यक फौजदार अनिल अहिरे ,चालक राजू पाटील ,या पथकाने लिहा तांडा येथील आरोपी एक नंबर दरबार रंग लाल जाधव वय वीस दुसरा आरोपी बाबूलाल देल सिंग चव्हाण राहणार लिहा तांडा तालुका जामनेर या आरोपींना पकडून या आरोपींविरोधात पहूर पोलिस ठाण्यात भा द वि 143/20 379 या प्रमाणे गुन्हा दाखल करून दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अमोल दिवटे करीत आहे.