डॉ. सुप्रभाजी म.सा. यांचे मार्गदर्शन
शारिरीक थकवा किंवा आरोग्याचे प्रश्न निर्माण झाल्यावर डॉक्टरांची आवश्यकता भासते, त्यांच्या योग्य परिक्षणाने त्याचे निदान होते. त्याप्रमाणे मनुष्याच्या जीवनात ‘जिनवाणी’ कार्य करते. सुख प्राप्तीसाठी दु:खाचे कारण म्हणजे क्रोध, माया, लोभ यापासून दुर राहिले पाहिजे. ब्रम्ह मुहूर्तावर उठणे, अतिथींचे स्वागत करणे, क्रोध आल्यावर शांत राहणे.. यासाठी संतवाणीचे श्रवण करुन चिंतन, मनन करीत कृतिशील आचरण केले पाहिजे. जन्म झाला तर मृत्यू होणार हे त्रिकलाबाधित सत्य आहे, मात्र संतवाणीमुळे मृत्यूचे ज्ञान अवगत झाल्याशिवाय राहत नाही. असे विचार प.पू.डॉ. सुप्रभाजी म. सा. यांनी व्यक्त केले.
मनुष्य जन्माचे सार्थक होण्यासाठी वेळेचा सदुपयोग करण्याचा सल्ला महासती प.पू.उन्नतीप्रभाजी म.सा. यांनी दिला. जीवनात असलेले महत्त्वाची कार्य केली पाहिजे. चांगले कार्य पुढे ढकलू नये, प्रत्येक क्षण मौल्यवान असुन वेळेची क्षमता, मूल्य समजून त्याची गुंतवणूक चांगल्या कार्यामध्ये केली पाहिजे. मनुष्य सध्या मनी, मोबाईल, मेक-अप, मॉल या चार ‘एम’ मागे धावत असुन तसे न करण्याचा मौलिक सल्ला त्यांनी दिला.