सभासदांसह ग्राहकांच्या सदिच्छा भेटी
जळगाव (वाणिज्य प्रतिनिधी) : देवगिरी नागरी सहकारी बँक शाखा जळगाव १४ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी बँकेचे सभासद व ग्राहकांनी बँकेस सदिच्छा भेटी दिल्या. देवगिरी नागरी सहकारी बँकेच्या जळगाव शाखेत १४ व्या वर्धापन दिनानिमित्त सत्यनारायण पूजन सभासद धनलाल शेठ शिरसाठ यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी अभय मंडलिक उपस्थित होते.
भाजपा जिल्हा उपाध्यक्ष तथा उद्योजक अशोककुमार राठी, मुंदडा ट्रेडर्सचे भगवती प्रसाद मुंदडा, आरजी गोल्डचे संचालक रामदयाल सोनी, संजय मेडिकलचे घनश्याम बक्कड, गीता ब्रिक्सचे संचालक पद्माकर शिरसाठ यांच्या हस्ते भारतमाता प्रतिमा पूजन करण्यात आले. या प्रसंगी बँकेस मिळालेले पुरस्कार, शेड्युल्ड बँक दर्जा प्राप्त तसेच तीन हजार कोटींचा टप्पा उद्दिष्ट पूर्ण करण्याबाबात सखोल माहिती देण्यात आली. जळगाव शहर संघचालक, कार्यवाह शाहू नगर, महाबळ संघचालक, कार्यवाह व परिवार, सहकार भारती पदाधिकारी, शहरातील सहकारी बँका व पतसंस्था पदाधिकारी, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.