अमळनेर तालुक्यातील शिरुड रस्त्यावरील घटना
अमळनेर (प्रतिनिधी) :- तालुक्यातील शिरुड रस्त्यावर खदाणीच्या पाण्यात बुडून एका तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना दि. ११ रोजी घडली. अमळनेर पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
जितू रामचंद्र भिल (वय ३५) हा खदाणीत बुडाला असल्याची माहिती लक्ष्मण शंकर पाटील यांनी जितूचा चुलत भाऊ तुळशीराम लक्ष्मण भिल याला सांगितले. त्यांनी मिलिंद पाटील व सुनील आत्मराम भिल यांना सांगून त्याला बाहेर काढले. त्याला उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. चुलत भावाच्या फिर्यादीवरून अमळनेर पोलिस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलिस पुढील तपास करीत आहेत.