रावेर ( प्रतिनिधी ) – शिक्षण विकास मंडळ संचलित श्री ग गो बेंडाळे हायस्कूल विवरे ता रावेर येथील सभागृहात समाजसेवक आणि शिक्षण क्षेत्रातील दीपस्तंभ असलेल्या गोदावरी फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष माजी खासदार डॉ. उल्हास पाटील , सुभाष पाटील व प्रमिलाताई यांच्या मातोश्री तसेच शिक्षण विकास मंडळ विवरे ता रावेर या संस्थेच्या ज्येष्ठ सभासद स्व. गोदावरी आई वासुदेव पाटील यांचे दि.३ सप्टेंबर २०२५ बुधवार रोजी दुःखद निधन झाले. त्यांचे वय ९३ वर्षे होते. त्यानिमित्ताने शोक सभेचे आयोजन करण्यात आले.स्व.गोदावरी आईच्या प्रतिमेस मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार व फुले अर्पण करून विनम्र अभिवादन व भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. शोक सभेसाठी शास्त्री विद्यालय पिंपळगाव बु ॥ ता.भुसावळ येथील माजी मुख्याध्यापक श्री.शांताराम पाटील , संस्थेचे चेअरमन प्रा. शैलेश राणे,ज्येष्ठ संचालक व्ही.एस.राणे, विवरे बु॥ चे माजी सरपंच पत्रकार वासुदेव नरवाडे यांनी स्व. गोदावरी आईच्या पुण्यात्म्यास चिरशांती लाभावी म्हणून श्रद्धांजलीपर मनोगत व्यक्त केले.शाळेचे चेअरमन मा प्रा.शैलेश राणे, व्हा.चेअरमन गोपाळ राणे, सचिव केशव राणे, ज्येष्ठ संचालक धनजी लढे, व्ही.एस.राणे, रामचंद्रराव देशमुख, दिलीप राणे,शाळेचे मुख्याध्यापक पी.एच.वायकोळे, पर्यवेक्षक आर.टी.कोल्हे, प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका हर्षा बेंडाळे व्यासपीठावर होते. शोक सभेचे सूत्रसंचालन एस.व्ही.येवले सर यांनी केले.प्रसंगी शाळेतील जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक ,माध्यमिक विभागाचे सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी बंधू भगिनी प्राथमिक विभागातील सर्व शिक्षिका , प्राथमिक व माध्यमिक चे सर्व विद्यार्थी उपस्थित होते.