जामनेर तालुक्यात तोंडापुर येथील घटना
जामनेर (प्रतिनिधी) :- तालुक्यातील तोंडापूर येथे शेळ्या चारण्यासाठी जंगलात गेलेल्या दोघा चुलत भावांपैकी एकाचा तलावाच्या काठावरून पाय घसरल्याने पाण्यात पडून बुडून मृत्यू झाल्याची घटना बुधवारी दुपारी १२:३० वाजेच्या सुमारास घडली. पोलीस स्टेशनला घटनेची नोंद करण्यात आली आहे.
शेख रेहान वाहेद (१५) असे मृत बालकाचे नाव आहे. शेळ्या चारत असताना जवळील एका तलावात पाणी पिण्यासाठी दोघेही गेले होते. पाणी पित असताना काठावरून एकाचा पाय घसरला. पाणी खोलवर असल्याने व दोघांनाही पोहोचता येत नसल्याने रेहानचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. दरम्यान त्याच्या मदतीसाठी धावणारा त्याचा मामे भाऊ हा थोडक्यात बचावला आहे. रेहान याला रुग्णालयात नेले असता तेथे तपासून मयत घोषित करण्यात आले. घटनेमुळे गावात शोककळा पसरली आहे.