जामनेर तालुक्यातील शेंगोळा येथे ग्रामस्थांच्या तत्परतेने कारवाई
जामनेर (प्रतिनिधी) : तालुक्यातील शेगोळा गांवात दि.९ सप्टेबरच्या रात्री तीन अनोळखी तरुण शेती शिवारात संशयास्पद हालचाल करतांना काही ग्रामस्थांना दिसले. तिघं संशयीत तरुण चोरी करण्याच्या उद्देशाने फिरत आहेत, असा संशय ग्रामस्थांना येताच त्यांनी तातडीने रात्रीच फत्तेपूर पोलीसांना कळविले. फत्तेपूर पोलीसांनी विलंब न करता तत्परता दाखवून घटनास्थळी जाऊन तिघं संशयीतांना ताब्यात घेतले.
तिघंही तरूण चोरी करण्याच्या उद्देशाने फिरत असल्याचे पोलीस तपासात समोर आलेले आहे. शेगोळा ग्रामस्थांनी वेळेवर धाडसी भूमीका घेतल्यामुळे व पोलीसांच्या तत्परतेमुळे तिघं संशयीत चोरटे पकडले गेले आणि चोरीची घटना टळली. ग्रामस्थांच्या धाडसांचे व पोलीसांच्या तत्परतेचे सर्वत्र कौतूक होत आहे.फत्तेपूर पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या शेगोळा गावात दि.९ सप्टेबरच्या रात्री तीन संशयीत शहारूख रज्जाक तडवी (वय-२२), अयन्नोदीन अब्बास तडवी (वय-२६), मयूर विठ्ठल माळी (वय-१८, तिघं रा. कोल्हे ता.पाचोरा) हे तरुण शेती शिवारात मोटार सायकलवर संशयास्पद हालचाल करीत असल्याचा दाट संशय गांवातील काही ग्रामस्थांनाआला.
त्यांनी धाडस दाखवित विलंब न करता रात्रीच फत्तेपूर पोलीस स्टेशनचे सहा. पो. नि. अंकुश जाधव यांना कळविले. अंकुश जाधव यांनी तत्परता दाखवून पोलीस पथकासह घटनास्थळी जाऊन तिघं संशयीतांना ताब्यात घेतले आणि त्यांची चौकशी केली असता त्यांच्याकडे इले. वायरी व झटका मशीन, चोरी करण्यासाठी वापरले जाणारे कटर मिळाले आणि चोरी करण्याच्या हेतुने आलो असल्याचे तिघांनी कबूली दिली. त्यांच्याकडे १८ इंच लांब लोखंडी पात्यांचे कटर त्यांच्या अंदाजे किंमत ५०० रुपये, तिघांकडे-७००० रुपये, ६०० रुपये व १० हजार रुपये किंमतीचे तीन मोबाईल तसेच एक २० हजार रुपये किंमतीची हिरोहोडा एम.एच.-१९ ए टी.-९५८४ मोटार सायकल असा एकूण ४३ हजार ५०० रुपये किंमतीचा मुददेमाल जप्त करण्यात आलेला आहे. याबाबत पोकॉ-निलेश राठोड यांनी दिलेल्या फिर्यादीवरून फत्तेपूर पोलीस स्टेशनला सशयीत आरोपी शाहरूख तडवी, अयन्नोदीन तडवी व मयूर माळी यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून तिघांना ताब्यात घेतले आहे. याबाबतचा तपास सहा. पो. नि. अंकूश जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकॉ किशोर राठोड, संदीप पाटील, पोकॉ निलेश राठोड हे करीत आहे.