एमआयडीसी पोलीसांची कारवाई
जळगाव. – कुसूंबा कडून जळगाव कडे बियर साठा घेवुन येणाऱ्या दुचाकीस्वारास नाकाबंदी दरम्यान पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. 24 बॉटल्स् सह दुचाकी जप्त करुन दोघांच्या विरुद्ध गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.
जळगाव-अजिंठा रोडवरील कुसुंबा ता.जळगाव येथून दुचाकी क्र (एमएच.19.सी.टी.3168) वरुन मद्याची तस्करी होत असल्याची गुप्त माहिती पोलीस निरीक्षक विनायकराव लोकरे यांना मिळाली होती. सहाय्यक फौजदार आनंद सिंग पाटिल, जितेंद्र राजपुत, निलेश पाटील, आसिम तडवी असे रेमण्ड चौकात नाकाबंदी करत असतांना दुचाकीस्वारास थांबवुन चौकशी केली असता त्याच्या ताब्यातून 3 हजार 960 रुपये किंमतीच्या 24 बियरच्या बॉटल्स् मिळून आले आहे. पोलिस पथकाने दुचाकी सह विक्की रमेशलाल हासवाणी वय-30, सिंधी कॉलनी, राकेश रमेशलाल तोलाणी वय-37 अश्या दोघांना ताब्यात घेत गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.