जळगाव (प्रतिनिधी) जळगाव शहरातील दिक्षीतवाडीत मकरा अपार्टमेंट मध्ये वास्तव्यास असलेल्या ट्रकमालकाची ट्रक अज्ञात चोरट्यांनी लंपास केली. ईच्छादेवी समोरील मोकळ्या मैदानात नेहमी प्रमाणे ट्रक उभा असतांना चोरट्यांनी तो चोरुन नेल्याची तक्रार एमआयडीसी पोलिसात दाखल करण्यात आली आहे.
अभिषेक अशोक दिवसारी (वय-32)दिक्षीत वाडीत कुंटूबासह वास्तव्यास आहेत, ट्रक चालवुन ते कुटूंबीयांचा उदनिर्वाह भागवतात. त्यांच्या मालकीचा ट्रक (एमएच.12.पी.क्यु.5604) वर जोवेद गफ्फार पटेल चालक असून बुधवारी रात्री चालकाने ट्रक जळगावात आल्यानंतर नेंहमी प्रमाणे ईच्छादेवी मंदिरा समोरील मैदानात उभी करुन लॉक करुन घरी निघुन गेला. आज सकाळी बाहेरगाव माल घेवुन जाण्यासाठी ट्रक घेण्यासाठी चालक जावेद गेला असता त्याला ट्रक आढळून आला नाही. त्याने शोधा शोध केली. मात्र ट्रक बेपत्ता असल्याने त्याने मालक अभिषेक तिवारी यांना फोनवरुन घटना कळवल्यावर दोघांनी दुर-दुर ट्रकचा शोध घेतला मात्र, मिळून न आल्याने आज दुपारी एमआयडीसी पोलिस ठाणे गाठले. अज्ञात चोरट्यांच्या विरुद्ध गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.