स्थानिक गुन्हे शाखेची शनिपेठ पोलीस स्टेशन हद्दीतील कारवाई
जळगाव – शहरातील शनिपेठ हद्दीतील नेरी नाका स्मशान भूमीला लागून असलेल्या हॉटेल असोदा मटन हाँटेल च्या मागच्या बाजूला ओपन जागेवर अवैधरित्या विदेशी दारूची विक्री होत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बी. जी. रोहम यांना मिळाली होती. त्यानुसार आज सायंकाळी साडे सहा वाजेच्या सुमारास गुन्हे शाखेच्या पोलिसांनी धाड टाकली असता विदेशी दारूचा 1 खोका आढळून आला आहे व काही विदेशी बाटल्या असा एकुण अंदाजे पाच हजाराचा जवळपास साठा जप्त करण्यात आला आहे. यावेळी एक जण ताब्यात घेतले आहे. सदर
ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक बी.जी.रोहम यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे राजू मेढे , संजय हिवरकर, किरण धनगर ,प्रमोद लाडवंजारी, इद्रिस पठाण आदींनी ही कारवाई केली.