फैजपूर ;– नियमांचे उल्लंघन केल्याने शहरातील बसस्थानकासमोरील अमर शॉपिंग मॉलला सील ठोकण्याची कारवाई पालिकेचे कर्मचाऱयांनी आज केली. सलग दुसऱ्या दिवशी अशी कारवाई झाल्याने व्यापाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.
आज बसस्थानकासमोरील अमर शॉपिंग मॉलमध्ये ग्राहकांची मोठी गर्दी होती. तसेच याठिकाणी नियमांचे उल्लंघन झाल्याचे निदर्शनास आल्याने मुख्याधिकारी किशोर चव्हाण, विपूल साळुंखे व पालिकेचे कर्मचारी यांनी धडक भेट देताच मॉल ला सील करण्याची कारवाई केली .