चाळीसगाव तालुक्यातील घटना, ग्रामस्थांनी काठ्या मारून सोडवले
जळगाव (प्रतिनिधी) : चाळीसगाव तालुक्यातील एका गावात घराच्या बाहेर खाटेवर झोपलेल्या ८२ वर्षीय वृद्ध महिलेवर चक्क ३० वर्षीय तरुणाने अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. यावेळी महिलेने आरडाओरडा केल्याने मुलगा, सून यांनी तरुणाच्या तावडीतून महिलेला सोडवले. या प्रकरणी मेहुणबारे पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
चाळीसगाव तालुक्यातील एका गावात राहणाऱ्या ८२ वर्षीय महिलेने याबाबत तक्रार दाखल केली आहे. मंगळवार दि. २ सप्टेंबर रोजी रात्री १० वाजेच्या सुमारास ही वृद्ध महिला पोर्चमधील ओट्यावर असणाऱ्या खाटेवर झोपलेली होती. महिलेचा मुलगा, सून, नातू हे घरात झोपलेले होते. मध्यरात्री साडेतीन वाजेच्या सुमारास महिला गाढ झोपेत असताना अचानक त्यांच्या अंगावर कोणीतरी मिठी मारून अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न करू लागला.(केसीएन)महिलेने स्वतःची सोडवासोडव करण्याचा प्रयत्न केला. तेव्हा विजेच्या प्रकाशात संशयित आरोपी राहुल बापू केदार (वय ३०) हा दिसून आला.
महिलेच्या आरडाओरडा केल्यामुळे त्यांचा मुलगा, सून आणि नातू हे घराबाहेर आले. त्यांनी महिलेला मिठी मारलेल्या तरुणाला सोडवण्याचा प्रयत्न केला. तरी देखील तो महिलेला सोडत नसल्याने मुलगा व इतरांनी त्याला काठीने मारून सोडवण्याचा प्रयत्न केला. राहुल केदार याच्या पायावर काठीने मारले तेव्हा त्याने सदर वृद्ध महिलेला सोडले. सदर वृद्ध महिला प्रचंड घाबरलेली होती. ग्रामस्थ जेव्हा तरुणाच्या मागे धावत गेले तेव्हा तो त्याच्या घरात घुसल्याचे महिलेच्या मुलाने पाहिले आहे. त्यानुसार संशयित राहुल बापू केदार यांचेविरुद्ध मेहुणबारे पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.