चाळीसगाव तालुक्यातील धक्कादायक घटना, तिघांविरुद्ध गुन्हा दाखल, पीडित गर्भवती

चाळीसगाव तालुक्यातील एका गावात ही १६ वर्षीय तरुणी राहते. तिने दिलेल्या फिर्यादीनुसार, तिचा चुलत भाऊ याने शेतामध्ये नेऊन तिच्याशी जबरदस्ती करून बलात्कार केला. तसेच कोणाला काही सांगू नये म्हणून धमक्या दिल्या. याचबरोबर २ संशयित आरोपी नाना दीपक मोरे व पवन रावसाहेब मोरे यांनी तरुणी घरी एकटी असताना जबरदस्तीने घरात शिरून आळीपाळीने बलात्कार केला. तसेच कोणाला सांगितले तर घरच्यांना मारून टाकण्याची धमकी दिली.
त्यानंतर पुन्हा एकदा त्यांनी घरी एकटी असताना पाहून तिच्यावर बलात्कार केला आहे. तरुणी सोबत शरीरसंबंध करताना व्हिडिओ काढून त्यांनी गावात वायरल देखील केला.या अत्याचारातून सदर तरुणी ही गरोदर देखील राहिली आहे. या अमानुष घटनेबद्दल चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास पोलीस निरीक्षक शशिकांत पाटील करीत आहेत. दरम्यान या धक्कादायक घटनेमुळे चाळीसगाव तालुका हादरला आहे.









