शिरसोलीच्या बारी समाज विद्यालयात राष्ट्रीय क्रीडा दिन उत्साहात
शिरसोली (वार्ताहर) : येथील बारी समाज माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय येथे हॉकीचे जादूगर मेजर ध्यानचंद यांच्या जयंतीनिमित्त “राष्ट्रीय क्रीडा दिन “साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे मुख्याध्यापक राजेंद्र आंबटकर हे होते.
प्रमुख अतिथी म्हणून विद्यालयातील ज्येष्ठ शिक्षक सुनील भदाणे, आकांक्षा निकम, मनीषा पायघन, कांचन धांडे हे उपस्थित होते. मंचावर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते हॉकीचे जादूगर मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. शिक्षिका कांचन धांडे यांनी मेजर ध्यानचंद यांच्या जीवनावर प्रकाश टाकला. विद्यालयाचे मुख्याध्यापक राजेंद्र आंबटकर यांनी अध्यक्षीय भाषण केले. तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मनीषा पायघन यांनी केले. आकांक्षा निकम यांनी आभार मानले.









