जळगाव शहरातील अजिंठा चौकातील घटना
पहूर येथील अमोल बावस्कर यांना धुळे येथे जायचे असल्याने ते जळगावातील अजिंठा चौफुलीजवळ बसची प्रतीक्षा करीत उभे होते. त्यावेळी एक कार त्यांच्याजवळ आली व धुळे जाण्यासाठी विचारणा केली. त्यावेळी बावस्कर हे कारमध्ये बसल्यानंतर कारमधील इतर जणांनी आम्ही स्वतंत्र कार केली, दुसऱ्याला कसे बसविले म्हणून चालकाशी वाद घालू लागले. तसेच त्यांना मागे बसवा असे म्हणत बावस्कर यांना मागे व पुढे येण्या-जाण्यात गुंतवून ठेवले. या दरम्यान त्यांच्या खिशातून रोख २२ हजार ५०० रुपये व मोबाईल काढून घेतला. थोड्या अंतरावर गेल्यानंतर प्रवाशास खाली उतरवून देत कार निघून गेली. काही वेळानंतर खिशातून पैसे व मोबाईल काढल्याचे अमोल बावस्कर यांच्या लक्षात आले. तपास पोलिस नाईक प्रदीप चौधरी करीत आहेत.