पिलखोड गावाजवळ सापडले कोयते आणि तलवारी
चाळीसगाव ( प्रतिनिधी ) – चाळीसगाव नगरपरिषदेचे भाजपाचे माजी नगरसेवक प्रभाकर चौधरी यांच्यावर चार हल्लेखोरांनी खूनी हल्ला करुन ठार मारण्याचे प्रयत्न केला. याप्रकरणी चाळीसगाव पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झाल्यानतंर आरोपीच्या शोधार्थ चाळीसगाव पोलिसांकडून तीन पथके विविध ठिकाणी रवाना करण्यात आले आहेत. तर बुधवारी पिलखोडजवळ गिरणा नदीपात्रातील खडकावर दोन तलवारी व दोन कोयते सापडल्या आहेत. परंतू सापडलेले कोयते व तलवारी हे प्रभाकर चौधरी यांच्यावरील हल्ल्यात वापरण्यात आलेलेच हत्यारे आहेत का? याचा देखील पोलीस शोध घेत आहे.
चाळीसगाव न.पा.चे माजी नरगसेवक प्रभाकर चौधरी यांना एकटे गाठुन धारधार कायेत्याने जवळपास वार करण्यात आले. यात ते गंभीर जखमी झाले असून नाशिक येथे उपचार घेत आहेत. तर काल चाळीसगाव तालुक्यातील पिलखोड येथील गिरणा नदीपात्रात महादेव मंदीर व याठिकाणी दोन तलवारी व दोन कोयते असल्याची माहिती पिलखोडचे पोलिस पाटील प्रांत पाटील यांना मिळाल्यानंतर त्यांनी मिळालेली माहिती खरी आहे की नाही याची खात्री करून घेण्यासाठी घटनास्थळी जावून पाहणी केली. त्यांना मिळालेल्या माहितीनुसार नमुद ठिकाणी दोन तलवारी व दोन कोयते दिसून आल्यानंतर त्यांनी सदरची माहिती मेहुणबारे पोलिस स्टेशनला दिली.
सहपो.नि. प्रविण दातरे यांनी पोलिसांचे पथक घटनास्थळी पाठविले. पोलिसांनी पंचनाम करुन ती हत्यारे ताब्यात घेतली आहे. माजी नगरसेवक प्रभाकर चौधरी यांच्यावर मंगळवारी रात्री ११ ते ११.३० वाजेच्या दरम्यान जो प्राणघातक हल्ला झाला त्या हल्लयाशी संबंधीत लोकांनी कदाचित मालेगावकडे पळून जातांना या तलवारी आणि कोयते त्यांनी गिरणा नदीपात्रात टाकली असावी, असा संशय आहे. त्यादिशेने पोलिस तपास करीत आहेत. चाळीसगांवचे उपविभागीय पोलिस अधिकारी विजयकुमार ठाकूरवाड यांनी देखील या गंभीर प्रकाराची माहिती त्यांना प्राप्त होताच योग्य तो तपास करण्याची सुचना दिल्या आहेत.