जामनेर तालुक्यात पहूर-पाळधी येथील घटना
जामनेर (प्रतिनिधी) :- तालुक्यातील पहूर-पाळधी येथे सव्वा सहा लाख रुपये किमतीचे बॅन्ड साहित्य चोरीला गेल्याची घटना दि. २२ रोजी घडली होती. याप्रकरणी पहूर पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांनी पाळधी गावातीलच ७ जणांना अटक केली आहे. १ जण फरार आहे.
राहुल सदाशिव माळी यांचा बँड व्यवसाय आहे. त्यांच्या मालकीच्या गोदामातून ६ लाख २७ हजार किमतीचे बँड साहित्य चोरीला गेल्याची घटना शुक्रवार २२ रोजी घडली. याप्रकरणी संशयित भूषण प्रकाश पाटील (वय ३२), ज्ञानेश्वर अशोक पाटील (वय २३), आर्यन विकास पाटील (वय २१), शिवम ज्ञानेश्वर पाटील (वय २९), विशाल प्रकाश भुसारी (वय २२), निखिल विनोद पाटील व वैभव रघुनाथ पाटील (सर्व रा. पाळधी ता. जामनेर) अशी अटक करण्यात आलेल्या ७ जणांची नावे आहेत. या सर्वांना एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. याप्रकरणी पहूर पोलिसात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. अधिक तपास पोलिस करत आहेत.