जिल्हा परिषदेचे अनोखे पाऊल, नागरिकांसाठी “व्हॉट्सअॅप चॅटबोट” सुरू
नागरिकांना आता जिल्हा परिषदेशी संबंधित तक्रारी सोप्या पद्धतीने व्हॉट्सअॅप चॅटबोट च्या माध्यमातून मांडता येणार आहेत. तसेच जिल्हा परिषदेच्या विविध योजना, सेवा आणि विभागांशी संबंधित माहिती देखील याच व्यासपीठावरून सहज उपलब्ध होणार आहे. यासाठी जिल्हा परिषदेचा अधिकृत व्हॉट्सअॅप क्रमांक 9421610645 असा असून, नागरिकांनी फक्त या क्रमांकावर मेसेज करून आपली तक्रार नोंदवावी किंवा माहिती मिळवावी.
हा उपक्रम नागरिकाभिमुख प्रशासन आणि पारदर्शक कारभाराच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल ठरणार असून, जिल्हा परिषदेच्या कामकाजात डिजिटल गव्हर्नन्स आणि ई-गव्हर्नन्स चा प्रभावी वापर यामुळे अधिक वेगवान व सुलभ होणार आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल यांची दृष्टी “प्रत्येक नागरिकापर्यंत प्रशासनाची सेवा पोहोचवणे आणि तक्रारींना वेळेत प्रतिसाद देणे हे आमचे ध्येय आहे. यासाठीच व्हॉट्सअॅप चॅटबोट हा अभिनव प्रयोग जळगाव जिल्हा परिषदेमार्फत सुरू केला आहे,” या चॅट बोट च्या माध्यमातून नागरिकांना तक्रारी मांडता येणार आहेत व जिल्हा परिषदेच्या विविध विभागाची व योजणांची माहिती मिळविता येणार आहे.