जळगाव ( प्रतिनिधी ) – डॉ. उल्हास पाटील फिजिओथेरपी महाविद्यालयाच्या बीपीटीएच पहिल्या वर्षातील विद्यार्थिनी जान्हवी दीपक सोनी हिने जळगाव जिल्हा योगासन क्रीडा स्पर्धेत उल्लेखनीय यश संपादन करून महाविद्यालयाचे नाव उज्ज्वल केले आहे
ही स्पर्धा सोहम डिपार्टमेंट ऑफ योगा अँड नॅचुरोपॅथी, एम.जे. कॉलेज (स्वायत्त), जळगाव येथे पार पडली.या स्पर्धेत जान्हवीने आपली उत्कृष्ट कामगिरी करत फॉरवर्ड इंडिव्हिज्युअल इव्हेंटमध्ये सुवर्णपदक तसेच ट्रॅडिशनल इव्हेंटमध्ये रौप्यपदक मिळवले आहे.या कामगिरीमुळे तिची निवड ६ व्या राज्य योगासन स्पर्धेसाठी झाली असून, ही स्पर्धा चंद्रपूर येथे २२ ते २४ ऑगस्ट २०२५ दरम्यान होणार आहे.या यशाबद्दल महाविद्यालयाचे व्यवस्थापन, प्राचार्य, अध्यापकवर्ग व सहाध्यायी विद्यार्थ्यांनी तिचे मनःपूर्वक अभिनंदन केले असून राज्यस्तरीय स्पर्धेसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत.