रावेर तालुक्यात मांगी शेतशिवारात घडली घटना
यावल (प्रतिनिधी) :- तालुक्यातील विरोदा येथील तरुण शेतकरी हा दि. २१ ऑगस्ट रोजी दुपारी १२.१५ वाजेच्या सुमारास रावेर तालुक्यातील मांगी शेतशिवारात गेला असता तेथे ट्यूबवेलची मोटार सुरु करत असताना त्यांना विजेच्या तारांचा जबर धक्का बसल्याने त्यांचा मृत्यू झाल्याची घटना घडली. याप्रकरणी सावदा पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
योगेश गंगाधर चौधरी (वय ५०, विरोदा ता. यावल) असे मयत इसमाचे नाव आहे. गावात ते परिवारासह राहत होते. कृषी केंद्रद्वारे व्यवसाय करून ते उदरर्निर्वाह करीत होते. गुरुवारी दि. २१ रोजी ते शेतशिवारात मोटर सुरु करीत असताना हि दुर्दैवी घटना घडली. पुढील उपचारासाठी ट्रॉमा केअर सेंटर भुसावळ येथे दाखल केले होते. तेथे त्यांचा मृत्यू झाला. सावदा पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.