जळगाव (प्रतिनिधी) :- गोदावरी नर्सिंग कॉलेज, जळगाव येथे दिनांक १२ ते १८ ऑगस्ट २०२५ दरम्यान युथ अगेंस्ट रॅगींग या घोषवाक्यांतर्गत आणि युनिफॉर्म ऑफ हिलींग नॉट हर्टींग या शीर्षकासह अँटी-रॅगिंग सप्ताह विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला.
या सप्ताहाचा उद्देश विद्यार्थ्यांमध्ये अँटी-रॅगिंगविषयी जनजागृती करणे, आपुलकी व ऐक्य दृढ करणे आणि रॅगिंगमुक्त परिसराची उपलब्धता करून देणे असा होता.१२ ऑगस्ट रोजी सप्ताहाचा शुभारंभ प्राचार्यांच्या स्वागतपर भाषणाने झाला. त्यांनी अँटी-रॅगिंग जनजागृतीचे महत्त्व स्पष्ट केले. प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित असलेल्या डॉ. ललिता माधवर सपकाळे, सहा. प्रा, डॉ. उल्हास पाटील लॉ कॉलेज, जळगाव यांनी रॅगिंगचे कायदेशीर परिणाम यावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमात अँटी-रॅगिंग प्रतिज्ञा घेण्यात आली. १४ ऑगस्ट विद्यार्थ्यांनी पोस्टर मेकिंग स्पर्धा, रील्स मेकिंग स्पर्धा, रांगोळी आणि घोषवाक्य लेखन स्पर्धा यात उत्साहाने भाग घेतला.१५ ऑगस्ट अँटी-रॅगिंग जनजागृती रॅली काढण्यात आली. विद्यार्थ्यांसह प्राध्यापक व स्वयंसेवकांनी सहभाग घेऊन समाजात रॅगिंगविरोधी संदेश पोहोचवला. त्यानंतर सीनियर-ज्युनियर संवाद मेळावा आयोजित करण्यात आला, १८ ऑगस्ट शेवटच्या दिवशी अँटी-रॅगिंगवर आधारित लघुपटाचे प्रदर्शन, विविध स्पर्धांतील विजेत्यांना प्रमाणपत्र वितरण शेवटी आभारप्रदर्शनाने कार्यक्रमाची सांगता झाली.