यावल शहरातील बोरावल गेट परिसरात घटना
यावल ( प्रतिनिधी ) – शहरातील बोरावल गेट परिसरातील शबरी नगरात राहणाऱ्या एका ३० वर्षीय गर्भवती महिलेचा चक्कर येऊन कोसळल्याने ३० वर्षीय मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी सकाळी बोरावल गेट परिसरातील शबरी नगरात घडली. यामुळे गर्भवती मातांच्या आरोग्याचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
सरिता मधुकर भिल (वय ३०) असे मृत महिलेचे नाव आहे. ती नऊ महिन्यांची गर्भवती होती. सरिता त्यांच्या तीन मुलांसोबत घरी असताना सकाळी आठच्या सुमारास त्यांना अचानक चक्कर आली आणि त्या जमिनीवर कोसळल्या. हा प्रकार लक्षात आल्यानंतर कुटुंबीयांनी त्यांना तत्काळ यावल येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तपासणी करून त्यांना मृत घोषित केले. याप्रकरणी यावल पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून, हवालदार निलेश चौधरी पुढील तपास करत आहेत.