जळगाव (प्रतिनिधी) – गोदावरी फाउंडेशन संचलित डॉ. गुणवंतराव सरोदे आयुर्वेद कॉलेज हॉस्पिटल व रिसर्च सेंटर, जळगाव आणि डॉ. उल्हास पाटील अँग्रीकल्चर कॉलेजमध्ये पारंपरिक उत्साहात पोळा सण साजरा करण्यात आला. ग्रामीण संस्कृती आणि पारंपरिक वारसा जपणाऱ्या या उपक्रमाचे उपस्थितांनी विशेष कौतुक केले.
या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. उल्हास पाटील, डॉ. सौ. केतकी पाटील, श्री सुभाष पाटील, डॉ. वैभव पाटील, प्रमोद भिरूड, डॉ. शैलेश तायडे, डॉ. पूनमचंद सपकाळे आणि डॉ. अशोक चौधरी उपस्थित होते. तसेच, शेतकी महाविद्यालय आणि आयुर्वेद कॉलेजचे प्राध्यापक, कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
कार्यक्रमाची सुरुवात डॉ. केतकी पाटील यांच्या हस्ते बैलांच्या विधिवत पूजनाने झाली. त्यांनी बैलांना पुरणपोळीचा नैवेद्य दाखवून पूजा केली. हा पारंपरिक सण साजरा झाल्यामुळे सर्वत्र आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण दिसून आले. ग्रामीण संस्कृतीशी जोडलेले हे कार्यक्रम भावी पिढीला आपल्या परंपरांचे महत्त्व पटवून देतात.