चाळीसगाव तालुक्यात भोरस फाट्यावर घटना, एक जखमी
चाळीसगाव (प्रतिनिधी) :- शहरातील धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील भोरस फाट्याजवळ दोन आयशर वाहनांची भीषण धडक होऊन एका वाहनावरील चालक यांचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात आज गुरुवारी दि. २१ ऑगस्ट रोजी पहाटे ४ वाजेच्या सुमारास घडला. याप्रकरणी चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सागर ताराचंद चव्हाण (वय २७ वर्षे, रा. सातपूर ता. कन्नड) असे मयत चालकाचे नाव आहे. गुरुवारी पहाटे पुढे जाणाऱ्या आयशरला मागून येणाऱ्या आयशरने जोरदार धडक दिली. पुढे असलेल्या आयशरलाही त्याच्या पुढे जाणाऱ्या अज्ञात वाहनाला धडक बसली. या दोन आयशर वाहनांची टक्कर झाल्यामुळे दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे.(केसीएन)धडकेमुळे मागील आयशर चालक सागर चव्हाण याचा मृत्यू झाला. अपघातात अनिल विठ्ठल राठोड (वय २३ वर्षे, रा. सातपूर ता. कन्नड) नामक आयशर क्लिनर गंभीर जखमी झाला. अपघाताची माहिती मिळताच चाळीसगाव पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी वाहतूक सुरळीत केली. दरम्यान, अचानक थांबणारा पुढील आयशरचालक घटनास्थळावरून फरार झाला आहे. या प्रकरणी क्लिनर अनिल विठ्ठल राठोडच्या तक्रारीवरून चाळीसगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जखमींना नागरिकांसह पोलिसांनी रुग्णालयात पोहोचविले.