जळगाव जिल्ह्यातील ३०० ग्रामपंचायतींचा यांचा सहभाग
मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल यांनी सांगितले की, “ॲनिमिया ही एक गंभीर आरोग्य समस्या असून ती मातामृत्यू, बालमृत्यू तसेच शारीरिक व बौद्धिक विकासात अडथळा आणते. ही मोहीम लोकसहभागातून प्रभावीपणे राबवून जळगाव जिल्हा ॲनिमिया मुक्त करण्याचा संकल्प आम्ही केला आहे.” जिल्हा परिषदेच्या सर्व विभागांचा या मोहिमेत समन्वय असून जिल्हा प्रशासनाने ग्रामपातळीपासून तालुका व जिल्हा स्तरापर्यंत कार्य योजना तयार केली आहे. जिल्हा परिषद जळगाव तर्फे सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की, या मोहिमेत सक्रिय सहभाग घेऊन ॲनिमिया निर्मूलनासाठी हातभार लावावा.
या मोहिमेत महत्त्वाच्या उपक्रमांचा समावेश
• गर्भवती व स्तनदा माता, किशोरवयीन मुले-मुली तसेच प्रजननक्षम वयोगटातील महिलांची हिमोग्लोबिन तपासणी.
• आयर्न फोलिक ॲसिड (IFA) टॅबलेट आणि आवश्यक पूरक आहाराचे नियमित वितरण.
• पोषणविषयक जनजागृती, योग्य आहार पद्धती व जीवनशैलीविषयी मार्गदर्शन.
• ग्रामपंचायत, आशा, अंगणवाडी सेविका यांच्या सक्रिय सहभागातून घराघरांत मोहिम पोहोचविणे.
• शाळा, महाविद्यालये, स्वयंसेवी संस्था यांचा सहभाग घेऊन व्यापक जनजागृती अभियान.