अमळनेर तालुक्यातील झाडी येथील घटना
अमळनेर (प्रतिनिधी) :- तालुक्यातील झाडी येथील एका शेतकऱ्याने कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या केल्याची घटना दि. १७ रोजी दुपारी १ वाजेच्या सुमारास उघड झाली. याप्रकरणी मारवड पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
नंदलाल किसन पाटील (वय ५२) असे मयत शेतकऱ्याचे नाव आहे. त्याच्या पश्चात वृद्ध आई, पत्नी, मुलगा आणि विवाहित मुली असा परिवार आहे. शेतीकामावर त्यांचा उदरनिर्वाह चालत होता.(केसीएन) नंदलाल पाटील यांनी स्वतःच्या शेतात निंबाच्या झाडाला रविवारी ठिबक नळ्या बांधून गळफास घेतला. त्यांना रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून मयत घोषित केले. नंदलाल यांच्याकडे ४ बिघे शेती असून त्यांच्यावर बँकेचे आणि सावकारी कर्ज असल्याचे नातेवाईकांनी सांगितले. मारवड पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून तपास हेडकॉन्स्टेबल संजय सूर्यवंशी करीत आहेत.