चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनचे यश
चाळीसगाव (प्रतिनिधी)- शहर पोलीस स्टेशन हद्दीतील मागील काही वर्षांपासून गहाळ झालेल्या मोबाईल फोनसंदर्भात नागरिकांनी दाखल केलेल्या तक्रारीवर अखेर शहर पोलिसांनी मोठे यश मिळवले आहे. सायबर पोलीस स्टेशन जळगावच्या तांत्रिक मदतीने चाळीसगाव पोलिसांनी एकूण २५ मोबाईल संच, अंदाजे किंमत सुमारे २ लाख १० हजार रुपये हस्तगत करून मूळ मालकांच्या ताब्यात परत दिले.
दि. १८ ऑगस्ट रोजी आयोजित कार्यक्रमात अप्पर पोलिस अधीक्षक कविता नेरकर, उपविभागीय पोलिस अधिकारी विजयकुमार ठाकुरवाड यांच्या हस्ते मोबाईल संच परत करण्यात आले. या कामगिरीत शहर पोलिस स्टेशनचे पोनि अमितकुमार मनेळ, पोकॉ शरद पाटील, पोकॉ नरेंद्र चौधरी, पोकॉ मोहन सुर्यवंशी, पोना सचिन सोनवणे, पोना ईश्वर पाटील, पोकॉ गौरव पाटील, पोकॉ मिलिंद जाधव तसेच सायबर पोलीस स्टेशन जळगावचे कर्मचारी यांचा मोलाचा सहभाग राहिला. पोलिसांच्या या उपक्रमामुळे नागरिकांमधून पोलिस प्रशासनाच्या कार्याचे कौतुक होत आहे.