जामनेर शहरात तणावपूर्ण शांतता
जळगाव (प्रतिनिधी) :- जामनेर शहरात २१ वर्षीय तरुणाची अमानुषपणे मारहाण करून हत्या करण्यात आल्याच्या प्रकरणात शहरात तणावपूर्ण शांतता आहे. याप्रकरणी जामनेर पोलीस स्टेशनला दहा ते बारा जणांविरोधात फिर्याद दाखल करण्यात आली असून अनेकांची धरपकड करण्यात आली आहे. तर जळगावच्या शासकीय रुग्णालयात इन कॅमेरा शवविच्छेदन करून मृतदेह नातविकांच्या ताब्यात देण्यात आला आहे.
सुलेमान रहीम खान (वय २१, रा.छोटा बेटावद, जामनेर) असे मयत तरुणाचे नाव आहे. जामनेर पोलिसात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नाशिक परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे हे देखील जिल्ह्यात आले असून घटनेची माहिती घेत आहेत. मयत सुलेमान रहिम खॉ पठाण याच्या वडिलांनी रहिम खाँ बनेखॉ पठाण, (वय ५०, रा.बेटावद खुर्द ता.जामनेर) यांनी फिर्याद दिली आहे. मुलगा सुलेमान रहिम खॉ पठाण हा शिक्षण घेत होता. मी व माझी पत्नी आम्ही शेती करुन आमचे परिवाराचा उदरनिर्वाह करतो. आज सोमवारी सकाळी १०.३० वाजता मुलगा सुलेमान हा नोकरीचे ऑनलाईन फॉर्म भरण्याकरीता जामनेर येथे गेला होता.(केसीएन)दुपारी ४.३० वा.चे सुमारास बेटावद खुर्द येथे फिर्यादी शेती काम करीत असतांना गावातील इसम नामे डोंगरसिंग राजपुत याने फोन करुन सांगीतले की, बेटावद खुर्द येथील बसस्टँडमध्ये दहा ते पंधरा लोक मिळुन तुमचा मुलगा सुलेमान रहिम खॉ पठाण याला मारहाण करीत आहे. लागलीच फिर्यादी, पत्नी तबस्सुम रहिम खॉ पठाण, मुलगी मुस्कान असे बेटावद खुर्द येथील बसस्टँड येथे पोहचलो.
तेथे फिर्यादी यांचा मुलगा सुलेमान रहिम खॉ पठाण हा अंडरपँडवर खाली पडलेला होता व दहा ते पंधरा लोक हातात लाठ्या, काठ्या, लोखंडी रॉड घेवुन तसेच लाथा बुक्क्यांनी मारहाण करीत होते.(केसीएन)त्यावेळी आमच्याच गावात राहणारा अभिषेक राजपुत, रणजीत रामकृष्ण माताडे व ओळखत असलेले जामनेर, वाकी परिसरात राहणारे आदित्य देवरे, सोज्वळ तेली, कृष्णा तेली हे जमावातील इतर दहा ते बारा लोकांसोबत मिळुन मुलाला मारहाण करीत असल्याचे बघीतले.
फिर्यादी रहीम खान, त्यांची पत्नी व मुलगी असे सुलेमान रहिम खाँ पठाण याला वाचवण्यासाठी मधे पडले व माझ्या मुलाला मारू नका अशी मारहाण करणाऱ्या जमावाला विनंती केली. तरी अभिषेक राजपुत, रणजीत रामकृष्ण माताडे, आदित्य देवरे, सोज्वळ तेली, कृष्णा तेली यांनी जमावातील अनोळखी लोकांसोबत मिळुन मला, माझ्या पत्नीला व मुलीला शिवीगाळ करुन लाथा बुक्यांनी, काठ्या, लोखंडी रॉडने मारहाण केली.
तसेच जमावातील लोक मला व माझे परिवाराला उद्देशून आज यांना सोडणार नाही, यांची इज्जत लुटून टाकू अशी धमकी देत होते. रहीम खान यांच्या कुटुंबीयांना मारहाण करीत असतांना त्यांचे परिचीत शेख शेख इम्रान शेख रशीद, मेहबुब खान अकबर खान (दोन्ही रा. बेटावद खुर्द ता. जामनेर)असे तेथे आले व गावातील लोक जमा होवू लागले. त्यामुळे मारहाण करणारे अभिषेक राजपुत, रणजीत रामकृष्ण माताडे, आदित्य देवरे, सोज्वळ तेली, कृष्णा तेली व दहा ते बारा अनोळखी लोक हे तेथुन पळून गेले.
फिर्यादी हे व त्यांची पत्नी तसेच शेख इम्रान शेख रशीद, मेहबुब खान अकबर खान अशांनी मिळून मुलगा सुलेमान रहिम खॉ पठाण याला जखमी अवस्थेत घरी घेवुन गेलो. त्याला कपडे घातले व त्याला झालेल्या मारहाणीबाबत मी त्याला विचारले असता मुलगा सुलेमान याने सांगीतले की, त्याला सुरुवातीला जामनेर शहरातील ब्रँड कॅफे येथे अभिषेक राजपुत व दहा ते बारा लोकांनी जबर मारहाण केली व त्याचे कडिल विवो कंपनीचा मोबाईल जबरदस्तीने काढुन घेतला. आणि ते त्याला जामनेर येथुन बेटावद खुर्द येथील बसस्टँडवर घेवुन आले. तेथे त्याला सगळ्यांनी मिळुन मारहाण केली. त्यानंतर फिर्यादी तसेच त्यांचे वडिल बनेखॉ मोहम्मद खॉ पठाण, शेख इम्रान शेख रशीद, मेहबुब खान अकबर खान असे मिळुन जखमी अवस्थेत असलेला माझा मुलगा सुलेमान याला उपचार कामी उपजिल्हा रुग्णालय जामनेर येथे घेवुन आलो. तेथे डॉक्टरांनी मुलगा सुलेमान याला तपासुन तो मयत झाला असल्याचे रहीम खान यांच्या कुटुंबीयांना सांगीतले.
जामनेर पोलीस ठाण्यात वरील नमूद दहा ते बारा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास पोलीस निरीक्षक मुरलीधर कासार करीत आहेत. संशोधन करण्यात आले असून काहींना अटक करण्यात आली आहे. तर सकाळी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, जळगाव येथे सुलेमान खान शवविच्छेदन इन कॅमेरा करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. या वेळेला डीवायएसपी, पोलीस निरीक्षक उपस्थित होते.